Tadoba Tigers fight : ताडोबात 'माया' वाघिणीसाठी भिडले 'रुद्रा' आणि 'बलराम'...
'ताडोबा' बस नाम ही काफी है... पर्यटकांना भुरळ घालणारं नाव. ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पात अलिकडेच बलराम आणि रुद्रा वाघांची लढाई चर्चेचा विषय ठरली आहे...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजंगलाचा राजा म्हणजे हा 'वाघ' आपल्या आपल्या क्षेत्रात दबदबा रहावा आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत झगडताना पाहायला मिळतात
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिध्द 'माया' वाघिणीसाठी 'रुद्रा' आणि 'बलराम' हे 2 वाघ आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे
'माया' वाघिणीवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी 'रुद्रा' आणि 'बलराम' या वाघांमध्ये थरारक लढाई झाली.
या लढाईत दोन्ही वाघ भयंकर जखमी झाले आहेत, रविवारी (12 मार्च) पहाटे पर्यटकांना ही लढाई पाहायला मिळाली
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी आपल्या कॅमेऱ्यात ही झुंज कैद केली आहे.
ताडोबातील वाघांमुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबाकडे आकर्षित झालेले पाहायाला मिळते
'रुद्र' अचानक बलराम आणि माया समोर आल्यानंतर ही लढाई झाल्याचं पाहायला मिळालं