Tadoba Tiger Reserve : ताडोबा येथे दाखल होणार सहा विशेष जिप्सी , ताडोबा कोर झोन सिझन 1ऑक्टोबरपासून
कॅन्टरमध्ये प्रतिव्यक्ती 500 रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिक दृष्ट्या हे किफायतशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने ताडोबाच्या चिंचोळ्या मार्गावर पूर्ण जागा घेतात.
सोबतच कॅन्टरचा आवाज पण जास्त असल्याने गाडीची चाहुल लागताच प्राणी पळून जातात.
त्यामुळे वन्यप्राणी जवळून पाहता येत नाहीत.
याची दखल घेत ताडोबा प्रशासनाने आता नऊ पर्यटक बसू शकतील अशा सहा विशेष जिप्सी विकत घेतल्यात.
महत्वाचे म्हणजे या जिप्सीमध्ये देखील अतिशय कमी दर आकारण्यात येणार आहे.
ताडोबा कोर झोनचा पुढील सिझन म्हणजे 1 ऑक्टोबर पासून सेवेत रुजू होतोय.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने त्यांच्या टायगर सफारीसाठीच्या बुकिंग वेबसाईट मध्ये बदल केला आहे. बुकिंग साठी सध्या असलेली mytadoba.org ही साईट बंद करण्यात आली आहे
mytadoba.mahaforest.gov.in या साईटवरून आता बुकिंग करता येणार आहे.