PHOTO : लोणार सरोवराची पाणी पातळी का वाढली?
बुलढाण्यातील जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत यंदा तब्बल चौदा वर्षांनी पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे लोणार सरोवरातील पाच पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहे.
परंतु पाण्याची पातळी वाढल्यामुळे लोणार सरोवर अभ्यासकांना आता चिंता सतावू लागली आहे.
बेसॉल्ट खडकात असलेला जगातील एकमेव आणि उल्कापिंडामुळे तयार झालेलं खाऱ्या पाण्याचा जगातील दुसरा सर्वात मोठं सरोवर म्हणजे लोणार सरोवर.
पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्याने वेढा दिलेला आहे.
यंदा बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लोणार सरोवरात असलेले झरे हे प्रवाहित झाले आहेत.
जवळपास चौदा वर्षानंतर अनेक झरे हे डिसेंबर महिन्यात अजूनही वाहत आहेत.
त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेलं पाहायला मिळतं.
मात्र पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सरोवरातील पाच पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहेत.3
धीच ही मंदिरे जीर्ण झाली आहेत आणि पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याचं इथल्या अभ्यासकांचं म्हणणं आहे.