PHOTO : वडिलांच्या मृत्युमुळे मानसिक धक्का बसलेल्या भावाला सावरण्यासाठी मोठ्या भावाकडून अनोखी भेट
कोरोना महामारीत कोरोनाची लागण होऊन मरण पावलेल्या वडिलांचा सिलिकॉनपासून (Silicon) बनवलेला हुबेहुब पुतळा थोरल्या भावाने धाकट्या भावाला त्याच्या वाढदिवसालाच भेट दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभावाने दिलेली ही हदयस्पर्शी भेट सध्या बुलढाण्यातील चिखलीत चर्चेचा विषय ठरत आहे.
वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे धाकट्या भावावर विरहातून मानसिक आघात झाला होता.
या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याकरता कुटुंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले.
अखेर त्याच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत वडिलांचा हुबेहुब दिसणारा सिलिकॉनचा पुतळा पाहून धाकट्या भावाने अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथले दीपक विष्णू विनकर हे ग्रामीण भागातील एका शाळेत शिक्षक होते. करोना महामारीच्या लाटेत 21 जून 2023 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.
चिडचिडपणा करुन तो एकटाच बसत होता. त्याचं शांत बसणं कुटुंबियांसाठी त्रासदायक ठरत होतं. त्याच्या बदलेल्या वागण्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते.
सुमिधला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी थोरला भाऊ शुभम, आई आणि मामा यांनी अथक प्रयत्न केले. अखेरीस कुटुंबियांच्या चर्चेतून सुमिधला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगळीवेगळी वस्तू भेट म्हणून देण्याचं ठरलं.
सुमिधच्या वाढदिवसाला वडिलांचा सिलिकॉनचा पुतळा भेट देऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या बंधुप्रेमाची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे.