Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हनुमान जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर साकारलं हनुमानाचं वाळूशिल्प, शिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती
आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रासह देशभरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहनुमान मंदिरात पुजेसह अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठणाचंही आयोजन करण्यात आले.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते
हनुमान जयंती निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून एका वाळूशिल्पकारानं स्वामींचं वाळुशिल्प साकारलं आहे.
वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमानाचे वाळूशिल्प साकारले आहे
वेंगुर्ले येथील आरवली जवळील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूवर रंगाची उधळण करत हनुमानाचे वाळूशिल्प साकारले आहे
सुमारे एक टन वाळूपासून हे वाळूशिल्प तयार करण्यात आले आहे.
वाळूशिल्प साकारण्यासाठी दोन तास लागले आहे
तळकोकणात मोठया उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला