Guru Purnima 2024 : बुलढाण्यातील अख्खं गावच शेगावच्या दिशेने निघालं; भाविकांचे डोळे गजानन महाराजांच्या दर्शनाला आसुसले
आज देशभरात गुरुपौर्णिमा साजरी केली जातेय. आपल्या गुरुंप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच निमित्ताबुलढाण्यातील शेगावातही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या संत गजानन महाराजांना वंदन करण्यासाठी जणू काही अख्खं गावंच शेगावच्या दिशेने पायी वारी करत निघालं आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मलकापूर येथून जवळपास दोन ते अडीच हजार भाविक हे पायी वारी करत शेगावकडे निघाले आहेत.
तीन ते चार दिवसांपासून हे भाविक पायी निघत आहेत. या दिंडीत मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील समावेश पाहायला मिळतोय.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महामार्गाने पायी वारी करत दिंडी ही आता शेगावच्या दिशेने निघाली आहे.
या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय.
एकूणचा या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय.