PHOTO : काल दगडफेक, आज जाळपोळ....खामगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर समाजकंटकांचा धुडगूस
बुलढाण्याच्या खामगाव शहरानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर काल रात्री दगडफेक झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दगडफेकीत खाजगी लक्झरी बस, कार, ट्रक अशा 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं. दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळ थांबली होती.
ही घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री समाजकंटकांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जयपुर लांडे फाट्यावरील चहाचे हॉटेल आणि टपऱ्यांना आग लावली.
यात चहाच्या हॉटेल आणि टपऱ्या जळून खाक झाल्या आहेत
काल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दगडफेकीत अद्यापही पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही
असं असतानाही पुन्हा रात्री याच राष्ट्रीय महामार्गावर खामगाव नजीक असलेल्या हॉटेल आणि टपऱ्यांना आग लावण्याची घटना घडली आहे.
त्यामुळे अशा समाजकंटकांना पकडण्याचा आव्हान खामगाव पोलिसांपुढे आहे.
ही जाळपोळ कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
दरम्यान, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्ग सहावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.