Buldhana News: बुलढाण्याच्या सैलानीत आज पेटणार लाखो नारळांची होळी, देशभरातून हजारो भाविक दाखल
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा भरगच्च यात्रा भरणार असून देशभरातील हजारो भाविक सैलानीत दाखल झाले आहेत.
यावर्षी ही परंपरेनुसार हजारो नारळांची होळी सैलानीत पेटवली जाणार आहे.
सैलानीतील नारळांच्या होळीला मोठे महत्त्व असल्याने या होळी उत्सवात महाराष्ट्रच नव्हेतर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात.
आज सायंकाळी पेटणाऱ्या होळी भोवती भाविक प्रदक्षिणा घालत असतात.
काळे बाहुले, लिंबू, गोटे, खिळे, बिबे टाचलेली नारळ मनोरुग्णांच्या अंगाखांद्यावरून ओवाळून जळणाऱ्या होळीत टाकल्याने अंगातील व्याधी दूर होतात अशी भावना भक्तांमध्ये आहे.
त्यामुळे प्रत्येक वर्षी तब्बल पंधरा ते वीस ट्रक भरतील एवढ्या नारळांची होळी येथे केली जाते.
ही होळी आज सायंकाळी पेटवली जाणार आहे. या होळीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
होळीच्या जागेभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तर यात्रेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सोबतच अग्निशामक दलेही आहेत. वाहतूक पोलीस, दामिनी पथक, आरसीपी पथकाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे जवान देखील यात्रेमध्ये खडा पहारा देणार आहेत.