Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Miss Universe 2023 : कोण जिंकणार मिस युनिव्हर्सचा मुकुट? दिविता रायकडे भारताचे प्रतिनिधित्व
Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स स्पर्धेची (Miss Universe 2023) आज अंतिम फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व दिविता राय हिच्याकडे आहे. (PC : DivitaRai/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूळची कर्नाटकची असलेली दिविता राय सध्या मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत 86 देशांच्या सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत.(PC : DivitaRai/instagram)
अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स शहरामध्ये 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe 2023) पार पडत आहे. (PC : DivitaRai/instagram)
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यंदा मिस युनिव्हर्सचा मुकुट कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. (PC : DivitaRai/instagram)
भारताच्या सुष्मिता सेन (Sushmita Sen), लारा दत्ता (Lara Dutta) आणि हरनाज संधू (Harnaaz Sandhu) यांनी हा मुकुट जिंकण्याचा मान मिळवला आहे. या तिन्ही सौंदर्यवतींनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.(PC : DivitaRai/instagram)
25 वर्षीय दिविता राय मूळची कर्नाटकची आहे. तिचा जन्म मंगळूरू येथे 10 जानेवारी 1998 रोजी झाला. (PC : DivitaRai/instagram)
दिविताचे प्राथमिक शिक्षण कर्नाटकमध्ये झाले असून तिने मुंबईच्या सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी शिक्षण घेतले आहे. (PC : DivitaRai/instagram)
दिविता राय व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते. तिला चित्रकला आणि संगीताचीही विशेष आवड आहे. (PC : DivitaRai/instagram)
दिविता रायचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात. वडिलांमुळे ती देशातील अनेक शहरांमध्ये राहिली आहे. (PC : DivitaRai/instagram)
दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला आहे. 2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती. (PC : DivitaRai/instagram)
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी रोजी रात्री पार पडणार आहे. (PC : DivitaRai/instagram)
भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येईल. (PC : DivitaRai/instagram)
भारतात हा कार्यक्रम JKN 18 हे चॅनेल आणि युट्यूबवर पाहता येईल. तसेच VOOT वर ऑनलाईनही हा कार्यक्रम पाहता येईल. (PC : DivitaRai/instagram)