Agriculture : नाफेडकडून हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ
नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या हरभरा खरेदीच्या नोंदणीस 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातीला हरभरा खरेदीच्या नोंदणीस 15 मार्चपर्यंतची मुदत देण्यात होती. मात्र, शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या या मागणीला अखेर यश आलं आहे.
हरभरा खरेदीच्या नोंदणीस मुदवतवाढ द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्याचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
मुदतवाढीमुळे नाफेडमध्ये हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचीही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे.
ल्या वर्षी जिल्ह्यात 75 हरभरा खरेदी केंद्र होती. परंतू यावर्षी अद्याप फक्त 24 हरभरा खरेदी केंद्र चालू आहेत. तरी मागील वर्षीप्रमाणे 75 खरेदी केंद्र चालू व्हावे, या मागणीसाठी आमचा लढा चालूच राहणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.
यावर्षी राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले निघत आहे.
मार्केटमध्ये हरभरा 4 हजार 300 रुपये दरानं विक्री होत आहे. तर हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 335 रुपये इतका आहे.
हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव देत आहेत.
खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपयांचा फटका बसत आहे.