Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड मध्यरात्री 1.36 वाजता टोलनाक्यावर, थर्टीफस्टआधी काय घडलं?, PHOTO
Walmik Karad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी आणि एसआयटीकडून तपास केला जात आहे. याचदरम्यान वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
31 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीकडे शरण आला होता. वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेल्याचं समोर आलं आहे. त्याबाबतीत पुष्टी देणारे तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
30 डिसेंबर 2024च्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी वाल्मिक कराड पुण्याला गेल्याची चर्चा आहे.
पाषाण येथे सीआयडी च्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मिक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती.
पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH 23 BG 2231 असा गाडीचा नंबर असून जी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे.
वाल्मिक कराडने मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.
याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे 30 डिसेंबरच्या मध्यरात्री 1.36 वाजता पास झाल्या. तसेच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे.