Buldhana News : केळीच्या पानावर कोरले राजमाता जिजाऊंचे चित्र; कलाकाराचे अनोख्या पद्धतीने अभिवादन
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची आज 426 वी जयंती आहे. या मंगलदिनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लाखों लोक जिजाऊंना वंदन करण्यासाठी दखल होत आसतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त वाशिमच्या वाघळूद गावातील युवा शिल्पकलाकार अभिषेक जाधवने केळीच्या पानावर राजमातेच चित्र रेखाटून अभिवादन केल.
राजमाता जिजाऊच्या 426व्या जयंती निमित्या अभिषेक जाधव या युवा कलाकाराने आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने राजमाता जिजाऊंना वंदन केले आहे. त्याच्या या कलाकृतीचे सर्वचं स्तरातून कौतुक केले जात आहे.
या पूर्वी देखील अभिषेकने विविध थोर महापुरूषांचे चित्र केळीच्या पानावर रेखाटले आहे.
गेल्यावर्षी झालेल्या शिव जयंती निमित्त सात देशांमध्ये होणाऱ्या द आर्ट कांटेस्ट मध्ये अभिषेकने भराताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याची टॉप रँक मध्ये निवड झाली.
अभिषेकने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे टरबुजवर चित्र कोरले होते.
त्यानंतर हे चित्र हे एवढं जगप्रसिद्ध झालं, की त्या चित्राची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाली.
अभिषेकची यापूर्वी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, चीफ एडिटर ऑफ नॅशनल रेकॉर्ड बूक, व्हिएतनाम येथील जागतिक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.