भंडाऱ्यात पार पडला सर्जा राजाच्या कृतज्ञतेचा 'मोहबल' सण उत्साहात, शेतकरी जोपासताय पारंपरिक पद्धती
आपल्या जिवाभावाच्या सोबत्याची कृतज्ञता म्हणून बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोळ्याच्या एका दिवसा आधीच्या रात्री शेतकरी बांधव मोहबल हा सण साजरा करतात.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरा करतोय.
सकाळी बैलांची आंघोळ करून रात्रीच्या वेळी बैलाची विधीवत पुजा करतात. त्यांची खांदेमळनी करून खांद्याना हळद आणि गुलाल लावला जातो.
त्यानंतर मोहाच्या तसेच कोहळ्याच्या बोंडांचा नैवेद्य खाऊ घालतात व त्यांना पोळ्याच्या जेवणाचे (आज आवतण आहे, उद्या जेवाले या) आवतण दिलं जातं.
अशाप्रकारे पोळ्याच्या एकदिवसा आधी भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आजही मोहबल सण साजरा करीत परंपरा जोपासताना दिसतोय.
आजच्या दिवशी मोठ्या उत्साहानं शेतकरी आपल्या सर्जा राजाची पूजा करुन त्याला पुरणपोळी भरवतात.
या दिवशी कोणताच शेतकरी बैलाला खांद्यावर ओझे देत नाही.