काय सांगता! बीडच्या रस्त्यावर अवतरले अंतराळवीर; पाहा फोटो

बीड शहरातील नगर रोड आणि जालना रोड आणि मोंढा नाका ते अमरधाम स्मशानभुमी परिसरात अचानक अंतराळवीर दाखल झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यावेळी अंतराळवीर आले अंतराळवीर आले, अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली. यानंतर लोकांनी त्याठिकाणी गर्दी केल्यानंतर कळले की ते रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डॉ. गणेश ढवळे यांचे लक्षवेधी आंदोलन होते.

याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस, रामनाथ खोड यांनी अंतराळवीरांचा प्रतिकात्मक वेश परिधान करुन बीड शहरातील रस्त्यांवरून प्रवास करत नेत्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला.
बीड शहरातील नगररोड आणि जालनारोड तसेच मोंढा नाका, जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.
रस्त्यावरील दुरावस्थेमुळे बीडकरांसह जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांची अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत सुरू आहे. मणक्यांच्या व्याधींनी त्रस्त असून मोठ्या प्रमाणावर अपघात घडलेले आहेत.
बीडमध्ये नेत्यांची आणि पुढाऱ्यांची कमतरता नसताना सर्वसामान्यांच्या हाल अपेष्ठांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य हे चंद्रग्रहावरील खड्डयांप्रमाणे अधोरेखित होत आहे.
चंद्रावर जसे खड्डे आहेत तसेच खड्डे बीडमधल्या रस्त्यावर पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत हे आंदोलन करण्यात आले आहेत.