Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधननिमित्त असं सजवा पूजेचं ताट; जाणून घ्या ताटात काय ठेवावे?
आज रक्षाबंधनाचा सण सगळीकडे साजरा केला जातोय. या निमित्ताने बहिण भावाला राखी बांधण्यासाठी ती मोठ्या प्रेमाने ताट सजवते. रक्षाबंधनाच्या ताटात कोणकोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंतर राखीचं ताट सजवणं हे प्रत्येक बहिणीसाठी खूप खास असतं. भावाला राखी बांधण्याआधी बहीण राखीच्या ताटाला खूप प्रेमाने सजवते. तुम्हीसुद्धा आज राखीचे ताट सजवणार असाल तर लक्षात ठेवा की चांदीचे ताट असावे, घरगुती ताट असेल तर त्यावर नवीन कापड घाला.
पूजेच्या ताटाच्या मध्यभागी ओम किंवा स्वस्तिक बनवा. पूजेच्या ताटात अखंड तांदूळ ठेवा. तसेच, हळद-कुंकू ठेवा. पूजेच्या वेळी भावाच्या कपाळावर टिळा लावून अक्षता लावा.
या दिवशी भगिनी पूजेच्या ताटात तांब्याच्या भांड्यात पाणी आणि चंदन ठेवतात. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये देवी-देवतांचा आशीर्वाद राहतो. यामुळे भावावर कधीही संकट येत नाही असे मानले जाते.
नारळ हे देवी-देवतांचे फळ मानले जाते. याचा उपयोग प्रत्येक शुभ कार्यात केला जातो. मान्यतेनुसार राखी बांधताना नारळ वापरल्याने भावाच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
ताटात तुपाचा दिवा लावा. असे मानले जाते की, हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी दिवा लावून भावाची आरती करतात. त्यामुळे भावा-बहिणीचे निखळ प्रेम कायम राहते.
आरती करून आणि राखी बांधल्यानंतर बहिणी आपल्या भावांना मिठाई देतात. म्हणूनच ताटात मिठाई असणे आवश्यक आहे. आजच्या दिवशी भावाला मिठाई खाऊ घातल्याने भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा राहतो.