PHOTO: बीडच्या गोपीनाथगड ते भगवान भक्ती गडापर्यंतच्या रॅलीला सुरवात
पंकजा मुंडे यांचा सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव घाट येथे आयोजित केला जात आहे.
पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे.
यासाठी बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड रॅलीला सुरवात झाली आहे.
प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली.
यावेळी ठीक-ठिकाणी प्रितम मुंडे यांचे स्वागत केले जात आहे.
यावेळी निघालेली रॅली गोपीनाथगड, सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव अशी असणार आहे.
यावेळी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत पाहायला मिळत आहे.