Beed News: आमदार संदीप क्षीरसागरांचा भन्नाट डान्स; पाहा फोटो

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा आपल्या तुफान डान्समुळे चर्चेत आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याच गीत गायन कार्यक्रमात संदीप क्षीरसागर यांनी निळा झेंडा हाती घेऊन अनोखा डान्स केला.
डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती.
यावेळेस निळा झेंडा हातात घेऊन संदीप क्षीरसागर स्टेजवरच गाण्यावर ठेका धरल्याने उपस्थित लोकांनी देखील एकच जल्लोष केला.
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती प्रसंगी समाजप्रबोधनकार सुप्रसिद्ध गायक राहुलजी अन्विकर यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार क्षीरसागर यांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मात्र याच कार्यक्रमातील आमदार क्षीरसागर यांच्या डान्सची मोठी चर्चा आहे.