Beed : गेट तोडून तलावातील पाणी नदीत सोडले; बीडमधील धारूर तालुक्यातील संतापजनक घटना
बीडच्या धारूर तालुक्यातील घागरवाडा साठवण तलावाच्या गेटचे कुलूप तोडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअज्ञाताने केलेल्या या कृत्याने शेती, पिण्यासाठीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून उन्हाळ्यात याची झळ दहा गावातील बसणार आहे.
चांगला पाऊस झाल्याने यंदा घागरवडा साठवण तलावात पाण्याचा साठा चांगला झाला होता.
उन्हाळ्यात शेती आणि पाण्यासाठी जवळपास १० गावातील ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
मात्र रात्री अज्ञाताने संरक्षक साखळी तोडत गेटची तोडफोड करत पाणी नदीपात्रात सोडले.
मंगळवारपासून गेटमधून पाणी नदीपात्रात वाहत आहे. ही संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे 0.65 मी ने पाणी पातळी कमी झाली आहे.
विनाकारण अमुल्य पाणीसाठी नदीपात्रात सोडल्याने ग्रामस्थांना रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरेल का याची चिंता सतावत आहे.
तसेच उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू शकते.
यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.