PHOTO : परळीत उभारला मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वज
परळीत मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा ध्वज 150 फूट उंच असून आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ध्वजाचे लोकापर्ण करण्यात आले.
परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज उभारण्यात आला आहे.
भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी हजारो नागरिकांनी घराच्या छतावरून ध्वजाला सलामी दिली.
धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेज वरील डोंगरावर राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारले असून, याठिकाणी मराठवाड्यातील सर्वात उंच म्हणजे तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे.
या सोहळ्यात 150 फूट तिरंगा ध्वजाचे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने ध्वजारोहन करण्यात आले.
बीड पोलिसांच्या बँड पथकाने वाद्यांच्या गजरात राष्ट्रगीत गाऊन ध्वजवंदना संपन्न झाली.
भारत माता की जय' या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. परळी शहरातील अनेक ठिकाणी नागरिक आपल्या घराच्या छतावरून या सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचे पाहायला मिळाले. व्यासपीठावर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.