Beed Robbery: मागची खिडकी गॅस कटरनं कापली अन् चोरांनी बँक लुटली; सोबत सीसीटीव्ही CDR मशीनसुद्धा पळवली
बीड जिल्ह्यातील एका बँकेत रात्री पडलेल्या दरोड्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमधील लिंबागणेश या गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री दरोडा पडला.
बँकेच्या मागच्या बाजूला असलेली खिडकी गॅस कटरनं तोडून चोरांनी बँकेत प्रवेश केला.
चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीतील अंदाजे 12 लाख रुपये लंपास केले आहेत.
विशेष म्हणजे, दहा वीस रुपयांच्या नोटाचे जे बंडल होते, त्यातले काही बंडल चोरांनी तसेच तिजोरीमध्ये ठेवले आणि 500, 2000 रुपयांच्या नोटा घेऊन चोर पसार झाले.
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँकेच्या इमारतीमध्ये शिडीलावून पाठीमागच्या खिडकीतून प्रवेश केला.
चोर बँकेतील सीसीटीव्हीचे रेकॉर्ड ज्या मशीनमध्ये होते, ती सीडीआर मशीनसुद्धा घेऊन पळून गेले आहेत.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.