Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांच्या पालखीचा आज परळीत मुक्काम, पाहा फोटो
श्री संत गजानन महाराज पालखी बीडच्या परळी शहरात दाखल झाली आहे. (सर्व छायाचित्र: स्माईल डिजिटल)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री संत गजानन महाराज पालखीचे परळीत सोमवारी दुपारी आगमन झाले असून, आज मुक्काम असणार आहे.
यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. दरम्यान परळी येथील थर्मल कॉलनीतील भाविकांनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले.
गण गण गणात बोते, विठ्ठल नामाचा व माऊलीचा जयघोष करीत पालखीचे आगमन झाले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पालखीचे दर्शन घेतले.
रखरखत्या उन्हात वारकरी भगव्या पताका, गळ्यात टाळ, पखवाजाच्या तालात पालखी परळीत दाखल झाली आहे.
तर गजानन महाराज पालखीसोबत सातशे वारकरी, तीन अश्व, नऊ गाड्या आणि रुग्णवाहिका आहे.
पालखी 27 जूनला पंढरपूरला पोहोचणार असून, दिंडी नऊ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे.
शेगाव ते पंढरपूर पायी वारी 33 दिवसांची असून, वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.