श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपतींच्या कारचा अपघात, महाराज शास्त्रींना पुण्याला हलवणार
बीड जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराजांच्या गाडीला पाथर्डी जवळील घाटात वळणावर अपघात झाला आहे. गहिनाथ गडावरून पाथर्डीच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
अपघातात विठ्ठल महाराजांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून चालक जखमी झालाआहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
विठ्ठल महाराज शास्त्रींना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी अहमदनगर येथील साईदीप या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, महाराजांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, हा अपघात कसा झाला याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, गाडी रस्त्यावरुन खाली गेल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाल्याचंही दिसून येत आहे. सुदैवाने महाराजांना गंभीर दुखापत न झाल्याने भाविकांचा जीव भांड्यात पडला