Ram Mandir Inauguration: मंदिर सजलं, आज जगभरात दिवाळी!
Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष! (Photo Credit : PTI)
1/10
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले असून देशभर जय्यत तयारी सुरू आहे. (Photo Credit : PTI)
2/10
या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. आज अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. (Photo Credit : PTI)
3/10
देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. या राम मंदिराचे नवे फोटो पाहा... (Photo Credit : PTI)
4/10
भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (Photo Credit : PTI)
5/10
या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करत आहे. (Photo Credit : PTI)
6/10
राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (Photo Credit : PTI)
7/10
अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत (Photo Credit : PTI)
8/10
नागपूर येथील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आजवर आपल्या नावे अनेक विश्व विक्रम नोंदविले आहे. यंदाच्या वेळी विशेष बाब म्हणजे अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) ते तयार करणार आहे. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. (Photo Credit : PTI)
9/10
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत. देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)
10/10
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. (Photo Credit : PTI)
Published at : 22 Jan 2024 10:39 AM (IST)