Top 6 Upcoming Cars in India: गाडी घेण्याचा विचार करताय? 'या' हटके टॉप-6 कार ऑगस्टमध्ये होणार लाँच
टाटा मोटर्सने (Tata Motors) या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपोमध्ये पंच सीएनजी सादर केली होती. यामध्ये नवीन ट्विन-सिलेंडर टाकी वापरण्यात येणार आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झाल्यास, 1.2-लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स गाडीत उपलब्ध असतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) इंडिया आपली सेकेंड जनरेशन GLC SUV लाँच करणार आहे. ही GLC 300 पेट्रोल आणि GLC 220d डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. मर्सिडीजची 4मॅटिक ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम या दोन्हीमध्ये दिसेल. दोन्ही 2.0-लिटर इंजिन असलेल्या कारला 48V इंटिग्रेटेड स्टार्टर मोटर मिळेल.
ऑडी (Audi) इंडियाने अलीकडेच भारतात आपला Q8 ई-ट्रॉन सादर केला आहे. ही फेसलिफ्टेड ऑडी ई-ट्रॉन एसयूव्ही आहे. क्यू8 ई-ट्रॉन एसयूव्ही आणि कूप बॉडी स्टाइलमध्ये नवीन फ्रंट फॅसिआ आणि मागील बंपरसह बी-पिलरवर 'ऑडी' आणि 'क्यू8 ई-ट्रॉन क्वाट्रो' बॅजिंगसह येईल. दुसरीकडे, त्याच्या रेंजबद्दल बोलायचे तर, एका चार्जवर 600 किमीपर्यंतची रेंज उपलब्ध होईल.
टोयोटा (Toyota) रुमियन एमपीव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही MPV Maruti Suzuki Ertiga वर आधारित असेल, जी कंपनी आधीच दक्षिण आफ्रिकेसारख्या बाजारात विकत आहे. यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे 103hp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करेल.
व्होल्वो देशात आपली दुसरी EV C40 रिचार्ज आणण्याच्या तयारीत आहे. ही आगामी EV Volvo च्या CMA (कॉम्पॅक्ट मॉड्युलर आर्किटेक्चर) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि यात 408hp पॉवर आणि 660Nm टॉर्क मिळेल. याला 530 किमीची WLTP सायकल रेंज मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
Hyundai त्याच्या Creta आणि Alcazar च्या एडव्हेंचर एडिशन सादर करू शकते. या आवृत्तीत फक्त कॉस्मेटिक बदल केले जातील. दोन्ही एसयूव्हींना नवीन 'रेंजर खाकी' पेंट मिळेल. यात ऑल-ब्लॅक इंटीरियर आणि इतर काही इंटीरियर अपडेट मिळण्याची शक्यता आहे.