Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2023 Suzuki Gixxer launched: मस्क्युलर लूक, 155cc फ्युएल-इंजेक्टेड इंजिन; अपडेटेड Suzuki Gixxer लॉन्च
सुझुकी मोटरसायकलने भारतात आपली Gixxer बाईक रेंज अपडेट केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन Suzuki Gixxer रेंज 9 नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यापैकी 3 आता मॅट पेंट स्कीममध्ये आहेत. नवीन Suzuki Gixxer बाईक रेंजची किंमत 1.40 लाख ते 2.02 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत.
कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त, नवीन Gixxer बाईक्सला फीचर अपडेट्स देखील देण्यात आले आहेत. कंपनीने Gixxer 155, Gixxer 155 SF, Gixxer 250 आणि Gixxer 250 SF बाईक्समध्ये Suzuki Ride Connect फीचर दिले आहे.
नवीन बाईक आता ब्लूटूथ सक्षम डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह येतात. ज्या स्मार्टफोनशी कनेक्ट केल्या जाऊ शकतात.
बाईकच्या डिस्प्लेवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल, एसएमएस अलर्ट, व्हॉट्सअॅप मेसेज आणि मिस्ड कॉल अलर्टशी संबंधित माहिती उपलब्ध असेल.
याशिवाय बाईकच्या डिस्प्लेवर स्पीड अलर्ट, फ्युएल लेव्हल, स्मार्टफोनची बॅटरी लेव्हल आणि अरायव्हल टाईमची माहितीही मिळणार आहे. बाईकचा इन्स्ट्रुमेंट कन्सोल अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीला सपोर्ट करतो.
सुझुकी मोटरसायकलने 2020 मध्ये Gixxer बाईक शेवटची अपडेट केली होती. त्यावेळी या बाईक्स नवीन रंग आणि ग्राफिक्समध्ये आणल्या होत्या. या बाईक्सच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सुझुकी Gixxer 155 आणि Gixxer SF 155 मध्ये हेच 155cc फ्युएल-इंजेक्टेड इंजिन दिले जात आहे. हे इंजिन 13.41 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क देते.