Skin Care Tips : तजेलदार त्वचेसाठी पपई आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे
Papaya Skin Care Tips : उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टॅनिंग होते. हे टॅनिंग पपईने सहज दूर करता येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपपईमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. पपईच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेला देऊ शकता. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असते. जे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर करते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर होते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होते.
टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कॉफीबरोबर पपईचा वापर करू शकता. टॅनिंग दूर करण्यासाठीही कॉफी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही पपईमध्ये कॉफी पावडर मिसळा आणि त्यात व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
पपईमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. त्वचेची छिद्रे सहज स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही पपईपासून क्लिंझर देखील बनवू शकता. तुमचा चेहरा खोलवर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफडमध्ये पपई मिसळून वापरू शकता.
पपई कुस्करा करा. त्यात मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. त्यात हळद आणि अंड्याचा पांढरा भाग घाला. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही या पॅकचा वापर करू शकता. हळद टॅनिंगची समस्या दूर करण्यास मदत करते आणि त्वचेचा टोन देखील उजळ करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.