Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World's Most Expensive Car Photo: मिनी बार, शॅम्पेन फ्रीजर, ओव्हनही; 'ही' आहे जगातील सर्वात महागडी कार; पाहा फोटो
Rolls-Royce Boat Tail: जगात कुठेही लक्झरी कारबद्दल जेव्हा चर्चा तेव्हा, त्यावेळी मनात रोल्स रॉयसचे नाव येते. ही एक अशी कंपनी आहे ज्यांच्या कारमध्ये इतके प्रीमियम आणि लक्झरी फीचर्स असतात की, यात कोणतीही कमतरता काढता येत नाही. मात्र याची किंमत देखील खूप जास्त असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत निवडक ग्राहक या कार खरेदी करू शकतात. मात्र कंपनीची एक अशी ही कार आहे, जी सामान्यच नाही तर अनेक श्रीमंतांच्या देखील आवाक्या बाहेरची आहे. या कारची किंमत सुमारे 206 कोटी रुपये आहे.
ही कार आहे रोल्स-रॉइस बोट टेल (Rolls-Royce Boat Tail). ही जगातील सर्वात महागडी लक्झरी कार आहे. ही कार इतकी महाग का आहे, हे आपण जाणून घेऊ...
ही फोर सीटर लक्झरी कार आहे. ही 6 मीटर लांबीची ग्रँड टूरर कार आहे. यामध्ये कॅनोपी रूफसह मागील बाजूस होस्टिंग सूटची सुविधा उपलब्ध आहे.
जबरदस्त लक्झरी फीचर्ससह ही कार मर्यादित युनिट्ससह उपलब्ध आहे. सध्या याचे फक्त तीन युनिट झाले आहेत. त्याचबरोबर या आलिशान कारमध्ये स्वित्झर्लंडची प्रसिद्ध घड्याळ निर्माता कंपनी हाउस ऑफ बोवेटचे खास घड्याळही देण्यात आले आहे.
या कारची आणखी एक खासियत म्हणजे गरज भासल्यास तिचा मागील भाग पिकनिक टेबलमध्येही बदलता येतो.
ज्यामध्ये तुमच्याकडे डिनर सेटपासून खुर्ची, शॅम्पेन फ्रीजर, कटलरी, ओव्हनपर्यंत अनेक लक्झरी फीचर्स आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार वापरू शकता.
या लक्झरी कारमध्ये 6.7-L पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे केवळ 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास क्षमता आहे.
याची लांबी 19 फूट, रुंदी 6.7 फूट आणि उंची 5.2 फूट आहे.
Rolls-Royce बोट टेल लक्झरी कारची किंमत 20 मिलियन पौंड (200 कोटींहून अधिक) आहे. याचा अर्थ भारतात तुम्ही या किमतीत प्रत्येकाच्या आवडत्या SUV कार Toyota Fortuner चे 400 पेक्षा जास्त टॉप मॉडेल्स खरेदी करू शकता.