Health Tips : 'या' व्यक्तींनी साखरेचं अति प्रमाणात सेवन करू नये; होऊ शकतात गंभीर परिणाम
Sugar Side Effects : लहान मुलांपासून मोठ्यांना गोड पदार्थ खायला आवडतात. गोड पदार्थ म्हटलं की साखर डोळ्यांसमोर येते.
Sugar Side Effects
1/9
साखर हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक गोडाच्या पदार्थांत वापरला जातो.
2/9
मिठाई असो किंवा खीर, खिचडी सणासुदीला तर साखरेचा वापर हमखास केला जातो.
3/9
अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते.
4/9
जास्त साखर खाल्ल्याने अल्झायमरचा धोका वाढतो. अल्झायमर हा एक गंभीर आजार आहे. ज्यामध्ये मेंदूची ग्लुकोज प्रक्रिया करण्याची क्षमता संपते.
5/9
जास्त साखर खाल्ल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे आजार होतात. यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होते.
6/9
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजची कमतरता होते. त्यामुळे माणसाला जास्त भूक लागते आणि वजन वाढू लागते.
7/9
तुम्ही साखर खाणे सोडले नाही, तर तुमच्या डाएटिंगवर त्याचा परिणाम होतो. आहारतज्ञांनी अनेकदा सांगितलं आहे की जर तुम्ही तुमच्या फिटनेसबाबत गंभीर असाल तर तुम्हाला मीठ आणि साखर सोडावी लागेल.
8/9
जास्त साखर खाल्ल्याने तुमची त्वचा खराब दिसू लागते. त्वचेवर पिंपल्स, डाग दिसू लागतात.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 02 Jan 2023 07:15 PM (IST)