महागडी Porsche फक्त 14 लाखात, चुकीच्या जाहिरातीनंतर कंपनीने मागितली माफी
तुम्ही सर्वात स्वस्त पोर्शे (Porsche ) कार खरेदी केली तरी तिची किंमत 80 लाखांच्या वर असेल. अशात जर कंपनीनेच जाहिरात केली की तुम्ही केवळ 14 लाख रुपयांमध्ये पोर्शे (Porsche ) खरेदी करू शकता, तर बुकिंगसाठी चेंगराचेंगरी होणारच आणि झाले ही तसेच.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने पोर्शे केवळ 14 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल, अशी जाहिरात देताच लाखो लोकांनी लगेच कार बुक केली. नंतर कंपनीच्या लक्षात आले की त्यांनी जाहिरातीत चुकीची किंमत लिहिली आहे.
यानंतर कंपनीने बुकिंग करणार्या ग्राहकांची माफी मागितली आणि नंतर त्यांची बुकिंग रक्कम परत केली. कंपनीने ज्या कारसाठी जाहिरात दिली होती त्याची खरी किंमत 1.21 कोटी रुपये आहे.
उत्तर चीनमधील (china ) यिनचुआन शहरातील एका पोर्शे डीलरने ऑनलाइन जाहिरातीमध्ये 124,000 युआन (chinese currency) (सुमारे 18,000 अमेरिकन डॉलर्स ) मध्ये प्रचंड लोकप्रिय 2023 Panamera मॉडेल सूचीबद्ध केले होते, ज्याची किंमत कारच्या मूळ प्रारंभिक किंमतपेक्षा (porsche car price in india ) खूपच कमी ठेवण्यात आली होती.
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, जाहिरात पाहिल्यानंतर लगेचच ही कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आणि बरेच लोक डीलरपर्यंत पोहोचले, तेव्हा लोकांना कळले की ही एक बनावट जाहिरात आहे.
जाहिरात पाहून शेकडो लोकांनी या कारसाठी बुकिंग केली आणि 911 युआनचे आगाऊ पेमेंटही केले.
पोर्शेने खुलासा केला आहे की ही किरकोळ किंमत जाहिरातीत देणे ही कंपनीची एक गंभीर चूक होती. जर्मन निर्मात्याने ही जाहिरात लवकरच काढून टाकली, परंतु तरीही चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर कारचा ब्रँड खूप ट्रोल झाला आहे. पोर्शे कंपनीने म्हटले आहे की, चीनमधील एका डीलरने पहिल्या ग्राहकाशी संपर्क साधला ज्याने Panamera साठी आगाऊ पैसे भरले होते आणि कारसाठी संवाद साधला होता.
दरम्यान, Porsche Panamera 8 सिलेंडर 2899 cc, 2999 cc, 3996 cc आणि 2894 cc इंजिनांसह 4 पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. या सर्वांसह ऑटोमॅटिक ट्रांसमिशन उपलब्ध आहे. व्हेरियंट आणि इंधनाच्या प्रकारानुसार Panamera चे मायलेज 10.75 kmpl आहे. Panamera ही 5 सीटर कार आहे.