Hydrogen Car : हायड्रोजन कारनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत, प्रदूषण मुक्तीसाठी घेतला पुढाकार
एकीकडे वाढतं प्रदूषण तसंच इंधनाचे वाढते भाव म्हणून इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कार कंपनी टोयाटोने ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणारी कार लॉन्च केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्तेच या कारचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
त्यानंतर आज संसदेत जाताना गडकरींनी याच कारने प्रवास केला आहे.
शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी प्रवास केला असून महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा दावा गडकरींनी यावेळी केला.
प्रदूषण नियंत्रणासाठी हायड्रोजन इंधन वापराच्या पर्यायाची पडताळणी करण्यासाठी गडकरींनी हा प्रवास केला.
संबधित कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांनी मिळून तयार केली आहे. ग्रीन हायड्रोजनच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ही कार आधारीत आहे.
नितीन गडकरींनी या कारमधून प्रवास केल्याचे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यानंतर राज्यसभेत भारतात वाहनांचं सेफ्टी रेटींग नेमकं कसं आहे, याबाबत ही गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं.