स्टाईल आणि फीचर्स दोन्ही दमदार, जबरदस्त आहे ही कार; नवीन Toyota Urban Cruiser HyRyder लॉन्च
Toyota ने आज आपली हायब्रिड कार Urban Cruiser HyRyder लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुलै 2022 मध्ये ही कार पहिल्यांदा रिव्हील केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी ही कार भारतात लॉन्च झाली.
कंपनीने या कारचे बुकिंग आधीच सुरू केले होते आणि आता ही कार लवकरच डीलरशिपपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल.
टोयोटा अर्बन क्रूझर हायडरचा फ्रंट लूक पूर्णपणे नवीन डिझाईनमध्ये बनविण्यात आला आहे. SUV ला क्रोम गार्निश्ड बंपरच्या अगदी खाली स्लिम LED DRL सह आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे.
यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, वाहन स्थिरता नियंत्रण, स्वयंचलित हवामान नियंत्रण, 9-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, हेड-अप डिस्प्ले, अॅम्बियंट इंटीरियर लाइटिंग, 7-इंचाचा समावेश आहे.
या कारच्या लॉन्चिंगसोबतच टोयोटाने त्याच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये VE ड्राईव्ह 2WD हायब्रिडची किंमत 18,99,000 रुपये आहे.
GE ड्राईव्ह 2WD हायब्रिडची किंमत 17,49,000 रुपये आहे.
SE ड्राइव्ह 2WD हायब्रिडची किंमत आहे 15,11,000 रुपये.
V ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 2WD निओ ड्राइव्हची किंमत आहे 17,49,000 रुपये, eDrive 2WD HYBRID ट्रिमची किंमत रु. 15.11 लाख आहे.
G eDrive 2WD HYBRID ची किंमत रु. 17.49 लाख आहे आणि eDrive 2WD HYBRID च्या टॉप-स्पेस व्हेरिएंटची किंमत 18 लाख आहे. (सर्व किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत). या कारची डिलिव्हरीही सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.