नवीन स्टायलिश Honda CB300F भारतात लॉन्च, किंमत 2.26 लाख रुपये
Honda CB300F भारतात 2.26 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ग्राहक कंपनीच्या बिगविंग शोरूम आणि वेबसाइटवर जाऊन ही बाईक बुक करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHonda CB300F दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आआली आहे. ज्यात Deluxe आणि Deluxe Pro प्रकारचा समावेश आहे. यांची किंमत टॉप व्हेरियंटसाठी 2.29 लाख रुपये आहे.
कंपनीने CB300F मध्ये 286 cc, सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 24.13 bhp पॉवर आणि 25.6 Nm टॉर्क जनरेट करते, याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. यात सेफ्टीसाठी असिस्ट स्लिपर क्लच देण्यात आला आहे. सोबतच यात ड्युअल चॅनल एबीएस देखील आहे. यासोबतच यात स्प्लिट सीट आणि गोल्डन फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे याचा लूक आणखी चांगला दिसतो. Honda CB300F मध्ये समोर 276 mm चा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 mm चा डिस्क ब्रेक आहे.
Honda CB300F ला सर्व बाजूंनी एलईडी दिवे आणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यात Honda RoadSync फीचर देण्यात आले आहे. जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे अनेक काम करते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कॉल, मेसेज, संगीत, नेव्हिगेशन आणि हवामानाची माहिती मिळवू शकता. हे हँडलवरील स्विचसह ऑपरेट केले जाऊ शकते.
याच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, Honda CB300F ला मस्क्युलर आणि टोन्ड टँक देण्यात आला आहे. जो बाईकला जबरदस्त लूक देतो. यात कॉम्पॅक्ट मफलर आणि व्ही-आकाराच्या अलॉय व्हीलसह स्प्लिट सीट मिळते. यात पुढील बाजूस सस्पेंशनसाठी USD फोर्क्स आणि मागील बाजूस 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनो शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. तसेच यात मागील बाजूस 150 मिमी रुंद रेडियल टायर देण्यात आले आहे.
चांगल्या रायडिंगसाठी या बाईकमध्ये इंजिन स्टार्ट स्टॉप स्विच, टाकीवरील की, USB-C फोन चार्जर देण्यात आला आहे. Honda CB300F स्पोर्ट्स रेड, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात 14.1 लीटरची इंधन टाकी असून याचे वजन 153 किलो आहे.