कार आहे की थिएटर? BMW ने लॉन्च केली Next Level कार; पाहा फोटो
2023 BMW i7 Electric Sedan Launched In India: दिग्गज वाहन उत्पादक कंपनी BMW ने भारतात नवीन i7 सेडान लॉन्च केली आहे. 7 सीरीजच्या कारची एक्स-शोरूम किंमत 1.70 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर i7 इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 1.95 कोटी रुपयांपासून सुरू होते.
ही BMW 7 सिरीजची पूर्ण इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. जी xDrive 60 मध्ये सादर केली गेली आहे.
कंपनी ही कार भारतात पूर्णपणे बिल्ट युनिट (CBU) म्हणून आयात करेल.
BMW 7 Series ICE मॉडेलवर आधारित i7 ची स्टायलिंग ब्लू अॅक्सेंटसह 7 सिरीजसारखीच आहे. याशिवाय याला खास डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतात. याच्या समोरच्या लोखंडी ग्रीलवर 'I' बॅज देखील आहे. या कारमध्ये कोणते खास फीचर्स कंपनीने दिले आहेत, हे जाणून घेऊ..
i7 ला iX प्रमाणेच दरवाजाचे हँडल मिळतात. बॅज वगळता मागील 7 सिरीजसारखाच आहे.
BMW i7 5,391mm लांब, 1,950mm रुंद आणि 1,544mm उंच आहे. BMW i7 मध्ये लक्झरी केबिन उपलब्ध आहे.
हे इन्फोटेनमेंट युनिट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी गोलाकार डिस्प्ले दिलेण्यात आले आहे. जे अनुक्रमे 14.9-इंच आणि 12.3-इंचचे आहे. याची इन्फोटेनमेंट सिस्टम BMW च्या iDrive 8 OS द्वारे समर्थित आहे.
यात थिएटर मोड, जे डिस्प्लेला सिनेमा-शैलीच्या फॅशनमध्ये 31.3-इंच 8K डिस्प्लेमध्ये बदलते.
याची स्क्रीन कारच्या छताखाली दुमडली जाते. जी बिल्ड-इन Amazon Fire TV द्वारे समर्थित आहे. डिस्प्लेवर OTT कंटेंट स्ट्रीम करणे देखील सोपे आहे.