Best Selling Cars in India : अनेक दशकांपासून लोकप्रिय आहेत 'या' कार, पाहा यादी
मारुती सुझुकीच्या (Maruti Wagon-R) सर्वात लोकप्रिय कारपैकी एक वॅगन-आर (Wagon-R) 1999 मध्ये लाँच झाली होती. मारुती कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दोन दशकांनंतर आणि तिसऱ्या पिढीतही वॅगन-आर कारचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारुतीची स्विफ्ट कार (Maruti Swift) 2005 मध्ये लाँच झाली होती. सध्या कंपनी या कारची तिसरी पिढी असून तिची लोकप्रियता कायम आहे. ही कार कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.
मारुतीने 1998 मध्ये आपली बलेनो सेडान कार (Maruti Baleno Sedan) लाँच केली होती, ही कार 2007 पर्यंत विक्रीसाठी होती. त्यानंतर कंपनीने 2015 मध्ये हीच कार हॅचबॅकच्या रूपात ही कार पुन्हा लाँच केली आणि ही कार आतापर्यंत ग्राहकांची पसंतीस कायम आहे.
या यादीत पुढील नाव ह्युंदाई आय 10 (Hyundai i10) चं आहे. कंपनीने ही कार 2007 मध्ये लाँच केली होती. ही कार सलग 16 वर्षांपासून कंपनीच्या मागणी असलेल्या कारच्या यादीत कायम आहे. कंपनीकडून सध्या त्याचे नवीन मॉडेल i10 Grand Nios विक्रीस आहे.
ह्युंदाईची दुसरी कार ह्युंदाई आय 20 (Hyundai i20) 2008 मध्ये लाँच झाली. कंपनी सध्या या कारच्या चौथ्या जनरेशनची विक्री सुरु आहे. या कारचा सलग 15 वर्षांपासून कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रीमियम कारच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
मारुतीने 2010 मध्ये आपली इको कार (Maruti Eeco) लाँच केली होती. मारुती इको कार सलग 13 वर्षांपासून बाजारपेठेत आपलं स्थान टिकवून आहे. अलीकडेच कंपनीने मारुती इको कार कारच्या विक्रीचा 10 लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे.
या यादीत सेडान कार होंडा सिटीचाही (Honda City Sedan) समावेश आहे. ही कार गेल्या 26 वर्षांपासून आपल्या सर्वांची आवडती कार राहिली आहे. कंपनीने या कारमध्ये सहा वेळा अपडेट केली आहे.