मर्सिडीजने लॉन्च केली भारतातील पहिली इलेक्ट्रिक लक्झरी सेडान, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
मर्सिडीज-बेंझने भारतात पहिली इलेक्ट्रिक लक्झरी सेडान लॉन्च केली आहे. ही कंपनीची EQS ची फ्लॅगशिप लक्झरी सेडान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEQS53 AMG ही पहिली बॅटरी-इलेक्ट्रिक एएमजी उत्पादन मॉडेल आहे. जे नवीन EQ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
AMG Performance 4MATIC+ ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह प्रत्येक एक्सलवर दोन पॉवरफुल मोटर्स असलेली ही परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार आहे.
कारचे एकूण आउटपुट 658 एचपी, 950 Nm च्या कमाल मोटर टॉर्क जनरेट करते.
यात AMG डायनॅमिक प्लस पॅकेज एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. बूस्ट फंक्शनसह RACE START मोडमध्ये कमाल आउटपुट 761 hp पर्यंत वाढते. कमाल मोटर टॉर्क नंतर 1020 Nm पर्यंत वाढते.
मर्सिडीजने या SUV मध्ये नवीन MBUX हायपरस्क्रीनचा वापर केला आहे. ही हायपरस्क्रीन तीन वेगवेगळ्या स्क्रीन जोडून एक मोठी स्क्रीन तयार करते. ही स्क्रीन डॅशबोर्डच्या पूर्ण रुंदीमध्ये पसरते.
ही कार 200 kW फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. यासह कंपनीने एक स्टॅंडर्ड 11 kW चार्जर आणि आणखी 22 kW फास्ट चार्जर उपलब्ध करून दिला आहे.
साध्या 240 व्होल्ट वॉल सॉकेटने चार्ज करण्यासाठी पूर्ण 11 तास लागतात.
दरम्यान, कंपनी ईक्यू ब्रँड अंतर्गत फ्लॅगशिप सेडान EQA, EQB, EQE आणि EQS आणणार आहे.
कंपनी 2025 पर्यंत 25 नवीन प्लग-इन हायब्रिड मॉडेल्स आणणार आहे. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात या गाड्या लॉन्च करणार आहे.