Pistachio Benefits : पिस्ता खाण्याचे एक, दोन नाही तर अनेक फायदे

Pistachio Benefits : पिस्त्यात फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यासही देखील मदत होते.

Continues below advertisement

Pistachio Benefits

Continues below advertisement
1/8
ड्राय फ्रुट्समधील ‘पिस्ता’ हा घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिस्ता अतिशय पोषक आणि फायबर समृद्ध ड्राय फ्रुट आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आढळतात.
2/8
पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. पिस्त्याचे तेल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. पिस्त्यात तांब्याचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळते.
3/8
पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. यामुळे अ‍ॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.
4/8
पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक हे घटक आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पिस्त्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आढळतात, जे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत.
5/8
नियमित पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. त्यामुळे पोटाचा आणि पचनाचा त्रास होत नाही. पिस्ता खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पिस्त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा.
Continues below advertisement
6/8
रोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. आपल्याला जास्त भूक लागत नाही, आपण जास्त खाणे टाळतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
7/8
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पिस्ता खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola