बाईकप्रेमींसाठी आनंदवार्ता! मे मध्ये लाँच होणार BMWच्या Motorrad टूरिंग रेंज बाईक्स
नामांकित BMW कंपनीच्या मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लवकरच लॉंच होणार आहे. यामुळे बाईक्सप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहुप्रतिक्षित असलेली BMW R 1250 RT, BMW K 1600 GTL, BMW K 1600 Bagger आणि BMW K 1600 या नव्या बाईक्ससाठी प्री-लाँच बुकिंग सुरू झाली आहे. या बाईक्स खरेदी करण्यासाठी BMW Financial Services India कडून पर्यायही उपलब्ध आहेत. नवीन BMW R 1250 RT डायनॅमिक टूरिंग मोटरसायकल जगात एक नवा बेंचमार्क सेट करणार आहे. ज्यामुळे आरामदायी आणि लांबच्या प्रवासात राइडिंगचा आनंद घेता येणार आहे.
मे 2022 मध्ये टूरिंग मोटरसायकलची नवी सिरीज भारतात लॉंच होणार आहे. आलिशान मॉडेल्स आणि उच्च कार्यक्षमता असलेली नवीन BMW K 1600 बाईक टूरिंगचा परिपूर्ण अनुभव देते -ऍथलेटिक, डायनॅमिक आणि उत्कृष्ट फिचर्स असलेल्या BMW K 1600 GTL बाईकचा प्रवास आरामदायी आणि चपळ आहे
BMW K 1600 B बाईकच्या बॅगर शैलीमुळे एका आलिशान पर्यटनाचा अनुभव मिळतो. BMW K 1600 Grand America बाईक मध्ये हायवे क्रूझिंग फिचर्स आहे. BMW Motorrad च्या प्रीमियम डीलर नेटवर्कच्या माध्यमातून भारतात विविध सेलिंग व सर्व्हिस करण्यात येणार आहे. 04 फेब्रुवारी 2022 पासून मोटारसायकल्स भारतातील BMW Motorrad डीलरशिपवर बुक करता येणार आहे.