पॉवरफुल इंजिन, स्मार्ट फीचर्स; नवीन Hyundai Tucson 'या' दिवशी होणार लॉन्च

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai आपली नवीन अपडेटेड Hyundai Tucson भारतीय बाजारपेठेत आज सादर केली आहे. या नवीन कारमध्ये आयकॉनिक डिझाइन, प्रीमियम कम्फर्ट, कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि नेक्स्ट लेव्हल सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ही एसयूव्ही भारतात जीप कंपास आणि सिट्रोएन सी5 एअरक्रॉसशी स्पर्धा करेल. याशिवाय ही कार टाटा हॅरियर, एमजी हेक्टर आणि महिंद्रा XUV700 च्या हाय-एंड प्रकारांना देखील टक्कर देणार आहे. कंपनी भारतात आपली ही नवीन कार 4 ऑगस्ट 2022 रोजी लॉन्च करेल. तर याची डिलिव्हरी येत्या काही महिन्यात सुरु होईल.

ऑल- न्यू Hyundai Tucson तिसऱ्या पिढीच्या कॉम्पॅक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. जे सर्वोत्तम Chassis Strength आणि सेफ्टी देते. यात लेव्हल 2 एडीएएस प्रणाली आहे.
नवीन Hyundai Tucson मध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्राईव्ह अटेंशन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आणि सेफ एक्झिट वॉर्निंग यासारखी सुरक्षा फंक्शन्स मिळतात.
यामध्ये 29 असे फीचर्स आहेत, जे फक्त याच कारमध्ये मिळतात. यात स्मार्ट कीसह रिमोट इंजिन स्टार्ट, 8 स्पीकर सिस्टम, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, एचजी ऑडिओ व्हिडीओ नेव्हिगेशन सिस्टीम यासारखे फीचर्स मिळतात.
2022 Hyundai Tucson SUV ची लांबी 4630mm, रुंदी 185mm, उंची 1665mm आणि व्हीलबेस 2755mm आहे. कार 1999cc, Nu 2.0 पेट्रोल, 6-स्पीड एटी इंजिन देण्यात आले आहे. हे पेट्रोल इंजिन 114.7kw ची पॉवर देते आणि 192Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच याच डिझेल इंजिनचा पर्याय देखील देण्यात आला आहे. जो 137kw 416Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो.