Photo: स्मार्ट आणि सेफ; Hyundai Aura Facelift लॉन्च, पाहा फोटो

2023 Hyundai Aura Facelift launched
1/10
वाहन उत्पादक कंपनी Hyundai Motor India ने आपले 2023 Aura फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे.
2/10
याची प्रारंभिक किंमत 6,29,600 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
3/10
या अपडेटेड मॉडेलमध्ये डिझाइन, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. सेडानमध्ये 30 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
4/10
या नवीन कराच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, ऑरा फेसलिफ्टच्या आतील भागात काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ही कार सेफ्टी आणि मॉडर्न फीचर्ससह येते.
5/10
या सेडानच्या बाहेरील बाजूस ब्लॅक आऊट रेडिएटर ग्रिल आणि पुढच्या बंपरवर नवीन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प (DRLs) आहेत. यामध्ये विशेषत: फ्रंट बंपर देखील ऑराला नवीन लूक देतो.
6/10
नवीन Aura फेसलिफ्ट R15 डायमंड कट अलॉय व्हीलसह येते, जे ही कार आणखी आकर्षण बनवते. क्रोमच्या बाहेरील दरवाजाचे हँडल ब्लिंगमध्ये भर घालतात.
7/10
मागील बाजूस या सेडानला विंग स्पॉयलर मिळतो, ज्यामुळे ही कार अधिक रुंद, स्पोर्टियर आणि अधिक शार्प दिसते. आतील बाजूस सेडानला एक नवीन सीट फॅब्रिक डिझाइन आणि पॅटर्न मिळतो.
8/10
पुढे ग्लॉसी ब्लॅक इन्सर्टसह नवीन डिझाइन फॅब्रिक अपहोल्स्ट्री, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, गियर नॉबवर क्रोम फिनिश, दरवाजाच्या हँडलमध्ये मेटल फिनिशसह पार्किंग लीव्हर टिप्स आणि ऑरा ब्रँडिंग लोगो मिळतो.
9/10
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल ही नवीन ऑरामधील काही सेफ्टी फीचर्स आहेत. जी स्मार्ट ऑटो एएमटीसह आणि पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय म्हणून ऑफर केली जातात.
10/10
ऑरा फेसलिफ्ट नवीन फर्स्ट-इन-सेगमेंट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि बर्गलर अलार्म आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारख्या इतर नवीन फीचरने सुसज्ज आहे.
Published at : 23 Jan 2023 05:31 PM (IST)