Harley Davidson Sportster S : हार्ले डेव्हिडसनची दमदार स्पोर्टस्टर एस लॉन्च; किंमत अन् फिचर्स काय?
Harley Davidson Sportster S : हार्ले-डेव्हिडसनने भारतात आपली रिवोल्यूशन मॅक्स इंजिन असणारी स्पोर्टस्टर एस (Sportster S) लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाची किंमत 15.51 लाख रुपये आहे. स्पोर्टस्टर एस (Sportster S) अमेरिकन मोटरसायकल कंपनीच्या सर्वात अॅडव्हान्स क्रूजरपैकी एक आहे.
यापैकी लिक्विड-कूलिंग, डुअल ओव्हरहेड कॅमशाफ्ट आणि व्हेरिएबल वॉल्व टायमिग यांसारखं अद्यायावत तंत्रज्ञान वापरलं आहे. हार्ले-डेविडसन स्पोर्टर एस तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. विविड ब्लॅक, स्टोन वाश व्हाइट पर्ल आणि मिडनाइट क्रिमसनमध्ये उपलब्ध आहे.
हार्ले-डेव्हिडसन स्पोर्टस्टर एसचं इंजिन 119.3bbhp च्या पॉवरचं आहे. तर 127.4Nm चं पीक टॉर्क जेनरेट होतं. यामध्ये 6-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिपर क्लच आहे.
या बाईकमध्ये एक गोल 4.0-इंच-व्यास TFT स्क्रीन देण्यात आली आहे. जी इंस्ट्रमेंटेशन आणि इंफोटेनमेंटची सुविधा देते. हे नेव्हिगेशन आणि इतर कामांसाठीही सक्षम आहे. यामध्ये ब्ल्यूटूथही देण्यात आली आहे.
हार्ले-डेव्हिडसन स्पोर्टस्टर एसमध्ये ऑल-एलईडी लायटिंग, क्रूज कंट्रोल आणि टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये चार रायडिंग मोड्स-रोड, स्पोर्ट्स, रेन आणि कस्टम यांसारखे फिचर्स मिळतात.
यामध्ये कॉर्नरिंग एन्हांस्ड अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमही (C-ABS) देण्यात आली आहे. यामध्ये एक 320 मिमी डिस्क आणि 260 मिमी डिस्कही देण्यात आली आहे.