देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये लागली आग, कंपनीने म्हटलं...

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील आहे. जिथे टाटा मोटर्सच्या नेक्सन ( Nexon) इलेक्ट्रिक कारला आग लागली. त्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. डीआरडीओ (Defence Research and Development Organisation ) या आगीच्या घटनेची चौकशी करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कारला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या वाहनाला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. आमचा तपास पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ. आपली वाहने आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टाटाच्या इलेक्ट्रिक कारला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यानंतर कंपनीने हे निवेदन जारी केले आहे.
टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, आगीची ही पहिलीच घटना आहे आणि आतापर्यंत कंपनीने 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकली आहेत, बहुतेक नेक्सन मॉडेल्स आणि या वाहनांनी 10 कोटी किलोमीटर अंतर कापले आहे.
याआधीही इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना घडली असून त्यात लोक जखमी झाले आहेत. सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. तपासात बॅटरी सेलमध्ये दोष आढळून आला. Ola Electric, Okinawa Autotech आणि Pure EV सारख्या अनेक इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्यांनी देखील दुचाकी परत मागवल्या आहेत.
या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्यांना दंड आकारण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांनंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्थापन केलेली समिती या महिन्यापर्यंत आपला अहवाल सादर करू शकते, असे मानले जात आहे.