Health Tips : बहुगुणी गाजर आहे आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या फायदे

रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. गाजराचे आणखी काही फायदे जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. पण फक्त गाजर हलवा खाण्यापेक्षा गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.

गाजर हे मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं. गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.
पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. पोटात जंत झाले असतील, तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस घेतल्यास जंत निघून जातील.
गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.