Budget Sunroof Cars : तुम्हाला सनरूफ कार घ्यायचीय? तर 'या' बजेट फ्रेंडली कार पाहा; कमी किंमतीत अप्रतिम वैशिष्ट्य
सनरूफ फीचरच्या जोरदार मागणीमुळे, ऑटोमेकर्सनी आता बजेट वाहनांमध्ये देखील ते ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सनरूफ कार घरी आणता येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनरूफ वैशिष्ट्यासह येणारी सर्वात परवडणारी कार म्हणजे Hyundai Exeter micro SUV, कंपनी ही कार 6 लाख रुपये ते 10.15 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
दुसरी कार टाटा मोटर्सची टाटा पंच आहे, जिची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम किंमत 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते. टाटाची ही मायक्रो एसयूव्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंगसह उपस्थित आहे.
जर तुम्हाला हॅचबॅक कार घरी आणायची असेल, तर तुम्ही Tata Altroz चा विचार करू शकता. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.74 लाख रुपयांपर्यंत जाते.
चौथ्या क्रमांकावर Hyundai ची प्रीमियम हॅचबॅक i20 आहे. ज्यामध्ये कंपनी सनरूफ फीचर देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये ते 11.16 लाख रुपये आहे.
सनरूफसह येणारी या यादीतील पाचवी परवडणारी कार Mahindra XUV300 आहे. जी सनरूफसह घरी आणली जाऊ शकते. कंपनी त्याची 7.99 लाख रुपयांपासून ते 14.76 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीला विक्री करते.