ब्रिटीश लक्झरी कंपनीचं भारतात होणार पदार्पण, आपल्या सुपरकार्स करणार लॉन्च
ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह (McLaren Automotive) लवकरच भारतात एंट्री घेणार आहे. कंपनीने मुंबईत आपलं पाहिलं शोरूम उघडणार असल्याची घोषणा केली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत पहिली डीलरशिप सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॅक्लारेन ऑटोमोटिव्हने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या जगभरातील विस्ताराच्या उद्दिष्टांमध्ये ऑक्टोबरमध्ये भारतातील पहिले रिटेल स्टोअर सुरू करणे समाविष्ट आहे.
यामुळे आशिया पॅसिफिक प्रदेशात ब्रँडची उपस्थिती आणखी मजबूत होईल. मॅक्लारेन यूकेच्या प्लांटमध्ये असेंबल सुपरकार्सची विक्री करते.
मॅक्लारेन ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक पॉल हॅरिस म्हणाले, भारत ही लक्झरी आणि प्रिमियम कारसाठी मोठी बाजारपेठ आहे. येथील लोक बाहेरील देशातून मॅक्लारेन कार आयात करतात. आम्ही लवकरच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आमचे पहिले रिटेल स्टोअर सुरू करणार आहोत. भारतीय ग्राहकांना कंपनीच्या सुपरस्पोर्ट्स आणि हायब्रिड कारचा आनंद घेता यावा हे आमचे ध्येय आहे.''
पॉल म्हणाले की, कंपनीच्या रिटेल स्टोअरमध्ये सर्व मॉडेल्सवर विक्री केली जाईल. तसेच विक्रीनंतर सेवा, सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती सुविधा देईल.
कंपनीची भारतात आपल्या बऱ्याच कार लॉन्च करण्याची योजना आहे.
यातच मॅक्लारेन जीटी आणि मार्कचे पहिले हाय-परफॉर्मन्स हायब्रिड आर्टुरा याचाही समावेश आहे.
कंपनी भारतात आपल्या 720S सुपरकार्सची Coupe आणि Spyder रेंज सादर करणार आहे.
यासोबतच कूप आणि स्पायडर कारही 765LT रेंजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
McLaren ने नुकतीच McLaren GT सुपरकार भारतीय बाजारात लॉन्च केली. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने भारतात या कारच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी घेतली.