AMO's electric scooter: एएमओची इलेक्ट्रिक स्कूटर 'जॉण्टी प्लस' बाजारात दाखल, पाहा फोटो
महागलेल्या पेट्रोलला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक स्कूटर्स मोठ्या प्रमाणात बाजारत येत आहेत. एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स कंपनीने एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजॉण्टी प्लस असं या स्कूटरच्या मॉडेलचं नाव आहे.
ही बाईक एका चार्जमध्ये सरासरी 120 किलोमीटरहून अधिक अंतर पार करु शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान या गाडीला संपूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ चार तासांचा अवधी लागतो, असंही कंपनीकडून कळवण्यात येत आहे.
ई-बाइक तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते आणि रेड-ब्लॅक, ग्रे-ब्लॅक, ब्ल्यू- ब्लॅक, व्हाइट-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक या पाच आकर्षक रंगांच्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या ई-बाइकची किंमत 1 लाख 10 हजार 460 रूपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाइक 15 फेब्रुवारी, 2022 पासून 140 डिलरशिप्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
या बाईकच्या लॉन्चदरम्यान एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार हे उपस्थित होते.