MG Hector 2023: नेक्स्ट-जनरेशन एमजी हेक्टर आली, ADAS लेव्हल 2 तंत्रज्ञानासह मिळणार हे जबरदस्त फीचर्स

2023 MG Hector Facelift Unveiled in India
1/10
एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे (Next-Gen Hector) अनावरण केलं आहे.
2/10
या कारमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान, आरामदायी ड्रायव्हिंग फीचर्सचा समावेश आहे.
3/10
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची निर्मिती ही अधिक सर्वोत्तम सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी करण्यात आली आहे.
4/10
या नव्या एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर आणि लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता फीचर्स आहेत.
5/10
ऑटोनॉमस लेव्हल 2 एसयूव्हीमध्ये 11 अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) फीचर्ससह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) आणि ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता आणि आरामदायीपणाची खात्री मिळते.
6/10
इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व्हेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या व्हेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न आणि अधिक सुरक्षिततेची खात्री देते.
7/10
नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेअर्स देखील त्रासमुक्त आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देतात.
8/10
स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडिकेटर लाईट आपोआप ऑन किंवा ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडिकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.
9/10
तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्ससह 100 वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर आणि आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टिव्हीटी, सर्विसेस आणि अॅप्लिकेशन्स आहेत.
10/10
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री, एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी 3-पॉईंट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी)आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्सचा समावेश आहे.
Published at : 09 Jan 2023 08:38 PM (IST)