PHOTO: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत MIM ची धुरा इम्तियाज जलील यांच्या खांद्यावर

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून यासाठी 15 उमेदवार रिंगणात असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीतील प्रचारासाठी एमआयएमची महाराष्ट्रातील टीम दिल्लीत तळ ठोकून आहे.

एमआयएमचे औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील सद्या वेगवेगळ्या वार्डात पक्षाच्या सभा घेतायत.
जलील यांनी आज प्रभाग क्रमांक 225 सीलमपूर येथे एमआयएमच्या उमेदवार शबनम हाजी रईस यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
तसेच वॉर्ड क्रमांक 246 श्रीराम कॉलनी उत्तर दिल्ली येथे एमआयएमचे उमेदवार सरताज अली यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
सोबतच प्रभाग क्रमांक 189 चे एमआयएमचे उमेदवार परवीन सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ पहेलवान चौकात सभा घेतली.
इम्तियाज जलील यांनी प्रभाग क्रमांक 209 जगतपुरी येथे एमआयएमचे उमेदवार हाजी शाहनवाज यांच्या जाहीर सभेला संबोधित केले.
यावेळी काँग्रेस, भाजपसह आम आदमी पार्टीवर जलील यांनी निशाना साधला.