Aurangabad:पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट?; अशी आहे परिस्थिती
हवामान विभागाच्या अंदाजानुसार अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे शेतकऱ्यांना हातांनी पाणी घालण्याची वेळ आली आहे.
पैठण तालुक्यात सुरवातीलाच शेतकऱ्यांकडून 58 हजार 331 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
वैजापूर तालुक्यात 60 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यानुसार 55 हजार 366 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
खुलताबाद तालुक्यात 80 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यानुसार 27 हजार 981 हजार हेक्टरवर पेरण्या उरकल्या आहेत.
कन्नड तालुक्यात70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, 72 हजार हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत.
फुलंब्री तालुक्यात 88 टक्के पेरण्या झाल्या असून, त्यानुसार 48 हजार 500 हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत.
सिल्लोड तालुक्यात 98 हजार 750 हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य असून, त्यापैकी 85 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.