Photo: रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट धरणात मारल्या उड्या...
कन्नड आणि वैजापूर या दोन तालुक्यांच्या हद्दीत येत असलेला मनेगाव फाटा ते सहानगाव या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून नागरिकांची होती.
परंतु दखल घेतली जात नसलयाने संतप्त झालेल्या सहानगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत खामगाव धरणात उड्या मारून जलसमाधी आंदोलन केले.
लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा या रस्त्यासाठी निधी देऊ अशी आश्वासने दिली मात्र रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे सहानगाव येथील नागरिकांनी खारी खामगाव धरणात जलसमाधी आंदोलन केले.
प्रशासनाने रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.
गावकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा पाहायला मिळाली.
गावकऱ्यांनी थेट धरणात उड्या घेतल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाल्याच पाहायला मिळाले.