Photo: पैठणच्या यात्रा मैदानातील अतिक्रमण भूईसपाट, वारकऱ्यांकडून कारवाईचे स्वागत
संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रा महोत्सव 13, 14, 15 मार्च दरम्यान होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने रविवारी (12 फेब्रुवारी) सकाळी यात्रा मैदानवरील अतिक्रमण भूईसपाट करण्यात आले.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
यावेळी बिडकीन, पाचोड, एमआयडीसी, पैठण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व आरसीएफ 2 पथकांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र यात्रा मैदानावरील मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार, गोदावरी घाटावर जाणाऱ्या मार्गावर मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.
त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.
प्रशासनाच्या या धाडसी कारवाईचे वारकरी, भाविक भक्तांनी स्वागत केले.
यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान यात्रा मैदानात पत्र्यांचे शेड टाकून दुकाने उभारलेले अतिक्रमण काढण्यात आले.